Ad will apear here
Next
झोंपाळ्यावरची गीता
श्रीमद्भगवद्गीतेत जे ज्ञान संस्कृत भाषेत आहे, ते सर्वांना उमजण्यासाठी विनोबा भावे यांनी १९३२ साली सुगम मराठीत गीताईची रचना केली. त्याआधी, १९१७मध्ये दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना केली होती. गीताईप्रमाणेच हादेखील मराठी भाषेला मिळालेला उत्तम ठेवा आहे. गीताईप्रमाणे ही रचना समश्लोकी नाही; परंतु गीतेतील आशय झोपाळ्यावर खेळण्याच्या वयातील मुला-मुलींनाही कळू शकेल इतक्या सुगम मराठीत ही रचना केलेली आहे. या गीतेच्या पहिल्या आवृत्त्या पुण्यातील चित्रशाळा प्रेसने प्रकाशित केल्या होत्या. सुमारे शतकभरानंतर, २०१५मध्ये सत्त्वश्री प्रकाशनाने ही झोंपाळ्यावरची गीता पुनर्प्रकाशित केली. आज (आठ डिसेंबर २०१९) गीता जयंती आहे. त्या निमित्ताने, झोंपाळ्यावरच्या गीतेतील १२वा अध्याय येथे प्रसिद्ध करत आहोत. संदर्भासाठी या पुस्तकात मूळ भगवद्गीतेचे अध्यायही देण्यात आले आहेत.
..........
झोंपाळ्यावरची गीता - अध्याय बारावा

कोणी तुज भजे । सगुण मानोनी ।। निर्गुण मानोनी । कोणी देवा! ।।१।।

परी उभयांत । कोण तो अच्युता ।। तुझा आवडता । भक्त? सांग ।।२।।

तनु-मनें धनें । माझ्यांत रंगले ।। त्यांनींच जिंकीलें । मला पूर्ण ।।३।।

निर्गुणाची भक्ती । भारीच कठीण ।। जणूं ती चढण । डोंगराची ।।४।।

लोखंडाचे चणे । बापा खाऊं जातां ।। पाडती ते दांता । शंका नको ।।५।।

बरीं की वाईट । कर्में जशीं होतीं ।। मज जे अर्पिती । प्रेमभावें ।।६।।

तया भाविकांना । उद्धरूनी न्याया ।। सदा मी विजया । सिद्ध असें ।।७।।

म्हणोनी अंतर । ठेवीं मजवरी ।। भय तिळभरीं । धरूं नको ।।८।।

साधितां एवढें। मीच तूं होशील ।। सुखें रंगशील । आत्मसुखीं ।।९।।

दृढ अभ्यासानें । मनातें जिंकोनी ।। लावीं तें चरणीं । माझे पार्था ।।१०।।

साधेना हें तरी । सोडूनी अहंता ।। स्वकर्म भारता । अर्पीं मला ।।११।।

हेंही जरी तुला । वाटलें कठीण ।। कर्मफळीं मन । ठेवूं नको ।।१२।।

साधनी या साऱ्या । कनिष्ठ अभ्यास ।। बरें त्यापरिस । ज्ञान कांही ।।१३।।

ज्ञानापेक्षां ही तें । चिंतन उत्तम ।। परी निरुपम । निरिच्छता ।।१४।।

सर्वांचा जो सखा । नव्हे जो मत्सरी ।। दयाळू अंतरीं । नम्र तैसा ।।१५।।

स्वार्थ नसे ज्याला । सुखदुःख सम ।। प्रिय तो उत्तम । भक्त माझा ।।१६।।

स्थिर ज्याचें मन । आणि समाधानी ।। सदैव जो ध्यानीं । रमे माझे ।।१७।।

तनु-मन-धन । मज जो अर्पितो ।। भक्त आवडतो । तोची मातें ।।१८।।

रागलोभांना जो । झालासे पारखा ।। धन्य भक्तसखा । तोची माझा ।।१९।।

सबाह्य अंतरीं । सदा जो निर्मळ ।। जणूं गंगाजळ । पवित्र तें ।।२०।।

कोणी किती छळो । दुखावे ना मनीं ।। प्रिय भक्तमणी । मजला तो ।।२१।।

अपमान मान । समान जो मानी ।। शत्रुमित्र दोन्ही । सम जया ।।२२।।

घर ज्याचें विश्व। । विश्व।बंधु तोची ।। तोची सव्यसाची । भक्तोत्तम ।।२३।।

सर्व भक्तांमाजीं । भक्ति जो अनन्य ।। करी तोचि धन्य । भक्तोत्तम ।।२४।।

तुज धर्म्यामृत । आतां जें कथिलें ।। करतील अपुलें । तें जे कोणी ।।२५।।

तेचि भाग्यवंत । भक्त खरे झाले ।। माझ्या गळ्यांतले । ताईत ते ।।२६।।
..........
मूळ भगवद्गीतेतील बारावा अध्याय

अर्जुन उवाच -
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥१॥

श्रीभगवानुवाच -
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥२॥

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥३॥

संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥४॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥५॥

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥६॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥७॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥८॥

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥९॥ 

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥१०॥
 
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥११॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाद्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥१२॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । 
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥१३॥

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्योमद्भक्तः स मे प्रियः ॥१४॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥१५॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥१६॥

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥१७॥
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥१८॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥१९॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥२०॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZVUCH
Similar Posts
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ! ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया... कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
गुरु: साक्षात् परब्रह्म। ‘‘मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार?’ या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होऊन, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका म्हणजेच अध्यात्म. हे ज्ञान ज्याच्या सान्निध्यात मिळतं, तो आध्यात्मिक गुरू. मुमुक्षूला म्हणजे मोक्षाची इच्छा असलेल्या व्यक्तीला गुरू शोधावा लागत नाही. गुरूच आपल्या योग्य शिष्याला आपल्याजवळ बोलावून घेतो किंवा स्वतः त्याच्याकडे जातो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language